खा. उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण…

0
10

पुणे (प्रतिनिधी) :  भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले  यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी आपली कोविड टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. सध्या उदयनराजे भोसले यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

चार दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उदयनराजे भोसले यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.