महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे लाक्षणिक उपोषण…

0
54

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आज (शुक्रवार) राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर थकीत वेतनासाठी उपोषण केले.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमार्फत संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आले. याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात एसटी विभागीय कार्यालायसमोर उपोषण करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील, शरद ताटे, विनायक पसारे, के. पी. पाटील, अमित कोवाडकर यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here