हाॅस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘त्या’ कोरोनाबाधिताचा मृत्यू : उपायुक्त (व्हिडिओ)

गिरगाव (ता. करवीर) येथील एका कोरोनाबाधित माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. प्रथमदर्शनी हाॅस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे दिसत असल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.  

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : वैभव नावडकर (व्हिडिओ)

दोन मे रोजी होणाऱ्या ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.  

विरोधकांच्या आरोपांमध्ये एक टक्काही दम नाही… : आ. पी. एन. पाटील (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघ आम्ही शेतकऱ्यांसाठीच चालवलाय. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये एक टक्काही दम नाही, आम्ही पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वास राजर्षी शाहू आघाडीचे नेते, आ. पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.  

‘गोकुळ’च्या कारभारावर बोलण्याऐवजी विरोधकांकडून केवळ महाडिकांवर टीका : रवींद्र आपटे (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघाच्या कारभारावर बोलण्याऐवजी विरोधकांकडून केवळ महाडिकांवरच होत असलेली टीका दूध उत्पादकांना आवडलेली नाही. निवडणुकीत ते आमच्याबरोबरच राहतील, असा विश्वास चेअरमन रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला.  

राजू शेट्टींची किमया दोन तारखेला दिसेल : महादेवराव महाडिक (व्हिडिओ)

राजू शेट्टी यांचा मिळालेला पाठिंबा लाखमोलाचा असून त्यांची किमया दोन तारखेला दिसेल असा विश्वास सत्तारूढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला.  

‘गोकुळ’ चांगलं चाललंय म्हणूनच ‘स्वाभिमानी’चा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा : राजू शेट्टी (व्हिडिओ)

दुधाला चांगला दर, मल्टीस्टेट करायचं नाही या अटींवर तसेच ‘गोकुळ’ चांगलं चाललंय म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  

दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी तळमळीने झटणारे सच्चे नेते : अरुण डोंगळे (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघामध्ये संचालक, चेअरमनपदी कार्यरत असताना संघाच्या प्रगतीत अरुण डोंगळे यांनी मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर छोटासा दृष्टिक्षेप…  

‘गोकुळ’ टिकला, ‘महालक्ष्मी’ संघ का बंद पडला..? (व्हिडिओ)

बऱ्याच आव्हानांना तोंड देत गोकुळ दूध संघ टिकला. पण महालक्ष्मी दूध संघ का बंद पडला, याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, असं आव्हान माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील (मुरगूडकर) यांनी दिलंय. खास मुलाखतीचा दुसरा भाग पहा ‘लाईव्ह मराठी’वर…  

दोन रुपये देतो सांगूनच ‘महालक्ष्मी’ काढला होता..! : धनंजय महाडिक (व्हिडिओ)

दोन रुपये देतो सांगूनच महालक्ष्मी दूध संघ काढला होता. आज काय अवस्था आहे त्याची, असा सवाल माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुरगूड येथील प्रचार मेळाव्यात केला.  

‘गोकुळ’साठी ‘त्यांनी’ कोरोनाबाबतच खोटं शपथपत्र दिलं : धनंजय महाडिक (व्हिडिओ)

जिल्ह्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर असूनही केवळ गोकुळ निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांनी खोटं शपथपत्र दिल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुरगूड येथील प्रचार मेळाव्यात केला.  

error: Content is protected !!