कोल्हापुरात दोघा चोरट्यांना अटक

0
39

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोघा सराईत चोरटयांना पकडून त्यांच्याकडून एका घरफ़ोडीत चोरलेले ७२,०६० रुपये किमतीचे १२०१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन दत्तात्रय गवळी (वय ३६) व सूरज विजय इंद्रेकर (दोघे रा. सुभाषनगर झोपडपट्टी, जुना कंदलनाका) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.

हे दोन्ही संशयित आरोपी चोरलेले चांदीचे साहित्य विक्रीसाठी मनोरा हॉटेल समोरच्या बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मनोरा हॉटेल परिसरात सापळा लावून दोघा आरोपींना पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, संतोष पाटील, संजय पडवळ, अनिल जाधव यांनी केली आहे.