शाहू टोल नाका येथे दोन चोरट्यांना अटक : ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

0
85

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शाहू टोल नाका येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आज (मंगळवार) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून परराज्यातील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक केली. राजेंद्र शिवाजी बाबर (वय ५२, रा. आसनगाव ता. कोरेगाव जि. सातारा) आणि राजकुमार पंडित विभूते (वय ३९, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या चोरट्यांकडून एक चार चाकी वाहन आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ९० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अमोल कोळेकर, नितीन चोथे, सागर कांडगाव, अजय वाडेकर, ओमकार परब, अजय काळे यांनी केली.