सराईत चोरट्याकडून दोन मोटारसायकली जप्त

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलिसांनी आज (गुरुवार) एका सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली. सुहास सदाशिव सटाले (वय ४२, रा. जिवबानाना जाधव पार्क) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ८० हजार रुपयांच्या २ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

एक सराईत मोटरसायकल चोरटा मैलखड्डा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शोधपथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. त्या वेळी या ठिकाणी आलेल्या मोटारसायकल चोरट्याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.