कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल फेकणाऱ्या आणखी दोघांना अटक  

0
114

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये गांजा व मोबाईल फेकणाऱ्या आणखी दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (वय २२, रा. शहापूर, इचलकरंजी, सध्या रा, कळंबा कारागृह) व राजेंद्र महादेव धुमाळ (वय ३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता ४ झाली आहे.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार,  २२ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील तटबंदीवरून काही तरुणांनी पाऊण किलो गांजा, १० मोबाईल हँडसेट, २ पेन ड्राईव्ह व ५ मोबाईलच्या कॉड असे साहित्य तीन पुठ्यामध्ये बांधून कारागृहामध्ये फेकले होते. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली होती, तर आज (गुरुवार) गेजगे व धुमाळ या दोघांना अटक केली.