कोल्हापूरच्या प्रश्नांबाबत दोन आमदारांचा स्वयंसेवी संस्थांशी सवांद…

0
22

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आ. रोहित पवार आणि आ. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला. आ. रोहित पवार हे कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, आ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या या संवादावेळी आ. चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

यावेळी संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा कोल्हापुरी बाणा कौतुकास्पद आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातील लोक राजकारण विरहीत काम करताना पाहून आनंद झाल्याचे आ. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले. आ. ऋतुराज पाटील यांनी केडीएमजी, व्हाईट आर्मी, क्रिडाई, बावडा रेस्क्यू फोर्स यांसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन, पर्यटनवृद्धी, आयटी पार्क विस्तार, रोजगार वाढविण्याचे प्रयत्न, विमानतळ विकास, नाईट लँडिंग आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत, गोकुळ संचालक नविद मुश्रीफ, केडीएमजीचे इंद्रजीत नागेशकर, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, स्मॅक प्रेसिडेंट अतुल पाटील, फोर्टी वनर्स क्लबचे अध्यक्ष उत्तम फराकटे, क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव यांनी सहभाग घेतला.

यावेळी गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, माजी गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, गौतम परमार, प्रदीप भारमल, राजू लिंग्रस, प्रकाशभाई मेहता, दीप संघवी, दुर्गेश लिंग्रस, राहुल देसाई, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.