कोल्हापूर पोलीस दलातील दोघांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची  आज (मंगळवार) केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषणा केली. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील एसीबीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसंतराव भोसले आणि एच.एस.पी.एस.पी. चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक बबन नारायण शिंदे यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. 

बबन शिंदे मूळचे तासगांव तालुक्यातील वज्र चौंडे गावाचे रहिवासी असून महामार्ग वाहतूक केंद्र उजळाईवाडी येथे सध्या कार्यरत आहेत. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांना चांगल्या कामगिरीसाठी २७४ बक्षिसे मिळालेली आहेत.

दरम्यान, ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, ७ जणांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यावर्षी  एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८  पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदक मिळाली आहेत.