अतिक्रमणावरून संभापुरात दोन गटात मारामारी : दोघे जखमी

0
85

टोप (प्रतिनिधी) : अतिक्रमणच्या कारणावरून संभापुरात काल (गुरुवार) रात्री दोन गटांमध्ये तलवार, लोखंडी पाईप, लोखंडी गज आणि काठ्यांनी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले. यावेळी एका चारचाकी मोटारीचे गाडीही फोडण्यात आली. दोन्ही गटांनी आज (शुक्रवार) एकमेकांविरुद्ध शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहीत पांडूरंग गुरव आणि सचिन विष्णू झिरंगे हे दोघे संभापुर गावचे रहिवासी आहेत. रोहित याने ग्रामपंचायतीकडे अतिक्रमणमध्ये घराच्या बांधकामास परवानगी मागितली होती, पण त्याला ती दिली नव्हती. परंतु, गावातील रहिवासी नसलेल्यांना परवानगी कशी दिली याबद्दल ग्रामसेवक यांचेकडे विचारणा केली. याचा राग मनात धरुन प्रमोद झिरंगे, सुरजे झिरंगे, देवदुत झिरंगे, शंकर झिरंगे, जयदिप झिरंगे, आकाश मांडेकर, ओंकार मिरजे, फारुख म्हालदार, सोन्या भोसले, स्वप्निल पाटणे, आकाश साळोखे हे सर्व (रा. संभापूर) यांनी तलवार, लोखंडी गोल पाईप, लोखंडी गज आणि काठ्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे रोहित गुरव याने सांगितले.

या मारहाणीत जखमी झालेला संदिप आप्पासाहेब कोकाटे याला शिरोली एमआयडीसी येथे सोडण्यासाठी सचिन झिरंगे हा स्वत:ची महिंद्रा बोलेरो एमएच-०९-डीएम- ६२६२ गाडी घेवून जात होता. त्यावेळी रोहीत कारंडे, अक्षय कारंडे, सागर पाटील, काशीनाथ कारंडे आणि त्यांच्यासोबत ४ ते ५ जणांनी हे सर्व (रा. संभापूर) यांनी त्यांची मोटरसायकल आडवी लावली. आणि गाडीत बसलेल्या संदिप याला काठीने लाथाब्युक्यांनी मारून वाईट-गाळ शिवीगाळ केली. तसेच महिंद्रा बोलेरोचे नुकसान केले. याबाबत दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.