कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने दोन कोरोना उपचार केंद्र बंद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आठ दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठातील दोन कोरोना उपचार केंद्रे बंद करण्यात आली. रूग्ण संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने आरोग्य प्रशासनासही दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनावरील ताणही कमी झाला आहे.

सहा महिन्यांपासून प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि बाधितांच्या उपचारात व्यस्त आहे. गरजेनुसार सीपीआर, शिवाजी विद्यापीठासह विविध ठिकाणी उपचार केंद्र सुरू केले. गेल्या महिन्यात कोरोनाचा कहर झाल्याने सर्वच उपचार केंद्र फुल्ल झाले होते. आठ दिवसांपासून रूग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे दोन उपचार केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

Live Marathi News

Recent Posts

शित्तूरच्या पाटील परिवाराचा वडिलांच्या उत्तरकार्यादिवशी अनोखा उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजात परंपरेच्या सबबीखाली…

2 hours ago