शेणगांवात घरफोडीचा प्रयत्न करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद    

0
402

गारगोटी (प्रतिनिधी) : शेणगांव (ता. भुदरगड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना येथील स्थानिक नागरिकांनी   प्रसंगावधान राखत पकडून बेदम चोप दिला. सुधाकर दत्तू जोगदंड (वय ४३) मनोहर दत्तू जोगदंड (वय ४० रा.बनसावळा, ता. केज, जि. बीड) अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शेणगांव येथील श्रीमती सुशिला श्रीपती माने यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी कटरच्या साहाय्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असता येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर हे चोरटे मोटारसायकलवरून पळून जात असताना संदिप आसबे व योगेश परिट यांनी या चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, मोटरसायकल जप्त केली आहे. या चोरट्यांना न्यायालयाने  एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.