राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले…

0
162

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे आज (शुक्रवार) पहाटे पुन्हा चौथ्यांदा दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणातून ४,२५६ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी सकाळी ११ वा २९ फूट १ इंचावर असून जिल्ह्यातील २५ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. पंचगंगेची पाणीपातळी काल सायंकाळपासून काही प्रमाणात स्थिर असली तरी पंचगंगेचं पाणी काही प्रमाणात पात्राबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्हा आणि धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर राधानगरी धरत १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आज पहाटे पुन्हा राधानगरी धरणाचे क्रमांक ६ आणि ३ असे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यातून २८५६ आणि बीओटी मधून १४०० असा एकूण धरणातून ४,२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.