Published October 15, 2020

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातून होणारा विसर्ग वाढला आहे. धरणाचा स्वयंचलित सहावा दरवाजा आज (गुरुवार) दुपारी १२.३८ वा. तर तिसरा दरवाजा दुपारी १२.४८ वा. उघडला आहे. धरणातील पाणीपातळी ३४७.५१ फूट इतकी आहे.

धरणाच्या दोन्ही दरवाजांतून प्रत्येकी १४२८ ने तर वीज गृहातून १४०० असा एकूण ४२५६ क्युसेक्सने विसर्ग होत आहे. तसेच कुंभी धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने रेडियल गेट नंबर १ व ३ मधून सव्वा अकरा वाजता ६५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या या धरणातून एकूण १६५० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे तुळशी धरणातून विसर्ग वाढवून ५०४ क्युसेक केला आहे.

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023