जिल्हा बँकेच्या आकर्षक व्याजाच्या दोन ठेव योजना

0
37

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त जिल्हा मध्यवर्ती  बँकेने आकर्षक व्याजदराच्या दोन ठेव योजना जाहीर केल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रा. छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव असलेल्या नावाने ‘यशवंत पुनर्गुंतवणूक’ व ‘यशवंत लखपती रिकरिंग’ या दोन ठेव योजना सुरू केल्या करीत असल्याची माहिती अध्यक्ष व मंत्री मुश्रीफ यांनी दिली. यशवंत पुनर्गुंतवणूक ठेव योजनेचा इफेक्टिव्ह व्याजदर ७.२९ टक्के असा मिळणार आहे.

या योजनेमध्ये संस्था व व्यक्तीस कमीत कमी रुपये पाच हजार व त्यापुढे एक हजारच्या पटीत बारा महिन्यांपासून ३६ महिन्यांपर्यंत रक्कम ठेव म्हणून ठेवता येणार आहे. या योजनेअंतर्गत एक जुलैपासून ३१ डिसेंबर २०२२ अखेर ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत. बँकेने इतर ठेवींच्या व्याजदरांमध्येही ६५ बेसिस पॉईंटपर्यंत वाढ केलेली आहे. यामुळे बँकेच्या नऊ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

बैठकीला उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील,  सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी या दोन्ही नवीन ठेव योजनांसह बँकेच्या ठेव योजनांच्या व्याजदर वाढीविषयी सविस्तर माहिती दिली.