Published October 19, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाझर तलावामध्ये मत्स्य व्यवसायाचा परवाना देण्यासाठी १८ हजारांची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी व कार्यकारी अभियंता अशा दोघांना रंगेहात पकडण्यात आले. जलसंधारण अधिकारी शिवाजी हनमंत नेसरकर (रा. निवारा कॉलनी, कसबा बावडा) आणि कार्यकारी अभियंता यशवंत लक्ष्मण थोरात (वय ५५ रा. वारणा बंगला, सिंचन भवन जवळ ताराबाई पार्क) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी,  कोल्हापुरातील एकाला पाझर तलावामध्ये मत्स्य व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्याने परवाना मिळवण्यासाठी ताराबाई पार्क येथील मृद व जलसंधारण विभागाकडे अर्ज दाखल केला होता. हा मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी या कार्यालयातील जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर आणि कार्यकारी अभियंता यशवंत थोरात यांनी त्याच्याकडे १८ हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार त्या व्यक्तीने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार या विभागाने आज (सोमवार) सापळा रचला होता. त्यावेळी व्यवसायाचा परवाना देण्यासाठी त्या व्यक्तीकडून १८ हजार रुपयांची लाच घेताना जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर व कार्यकारी अभियंता यशवंत थोरात या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार संजीव बमगेकर, पोलीस हवालदार शरद पोरे, पोलीस नाईक, विकास माने, मयूर देसाई आणि रुपेश माने यांनी ही कारवाई केली.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023