इचलकरंजीत गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक…

0
18

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रावत डुंडाप्पा उकली (वय ४०, रा. सोलगे मळा, शहापूर), सुनील महादेव शिरगावे (वय ३२ रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल टेम्पोसहीत जप्त केला. ही कारवाई आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास जैन मंदिरासमोर करण्यात आली.

राज्यात गुटखा विक्री आणि त्याच्या वाहतूकीला पूर्णतः बंदी आहे.  इचलकरंजीतील शिवाजी पुतळा मार्गावरून पांढरा रंगाच्या एक टेम्पोमधून  गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली होती. आज पहाटेच्या सुमारास जैन मंदिरसमोर हा टेम्पो पोलीसांनी संशय आल्यावर थांबवला.

यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी या गुन्ह्यातील चारचाकी वाहनासह ८ लाख ३२ हजारांचा गुटखा जप्त केला.