शिरोली परिसरात गुटखाविक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
397

टोप (प्रतिनिधी) : शिरोली परिसरात गुटखा वितरित करणाऱ्या नामदेव कृष्णा गावडे व बाळू हिवरा गावडे (दोघेही रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) या एजंटना शिरोली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून सुमारे पंचवीस हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला.

मागील आठवड्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही पान टपऱ्यांवर कारवाई करून साडेआठ हजारांचा गुटखा जप्त केला होता, पण या कारवाईने पानटपऱ्या व दुकानदारांची गुटखा विक्री करण्यासाठी मोठी गोची निर्माण झाली होती. पण या कारवाईची भीती न बाळगता धाडसाने पान टपऱ्यांवर गुटखा विक्री सुरूच आहे. त्यामुळे शिरोली पोलिसांनी आज (शनिवार) पान टपऱ्यांवर जात गुटखा विक्री करणाऱ्या या दोघा एजंटांना अटक केली आहे. या कारवाईने शिरोली परिसरात खळबळ माजली आहे.