इचलकरंजी परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
87

इचलकरंजी (प्रतिनिधी) : बंदी असूनही इचलकरंजी परिसरात दुचाकीवरून गुटखा विक्री करणाऱ्या दोन युवकांना गावभाग पोलिसांनी नदीवेस नाका पेट्रोल पंपासमोर अटक केली आहे. आरिफ मुजावर (वय १९), वैभव चौगुले (२४, दोघेही रा. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

या कारवाईमध्ये त्यांच्याकडून मुसाफिर, विमल अशा वेगवेगळ्या ब्रॅंडचा गुटखा, मोटारसायकलसह सुमारे १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन पाटील, राम पाटील, आरिफ वडगावे, योगेश कोळी आदींनी केली.