टोप परिसरात मटका खेळणाऱ्या दोघांना अटक

0
100

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील राजीव गांधीनगरमध्ये मटका खेळणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करून ४०६० रू. आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातून मटका खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्याना पोलिसांनी सळो की पळो केले. मात्र वर्षानंतर जिल्ह्यात मटका व्यवसायाचे डोके वर काढण्याचा प्रयत्न काही मटका मालक करत आहेत.

टोप येथील राजीव गांधीनगरमध्ये कल्याण मटका चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन मटका खेळणाऱ्या खाजेभाई रजाक नदाफ (रा. टोप, ता. हातकणंगले), याला ताब्यात घेतले. तर सागर सागडे (रा. मंगराईची वाडी, ता. हातकणंगले) हा मटका चालक असल्याचे समोर आल्याने तो पेठ वडगाव परिसरातून आपले मटका फिरवत असल्याचे समजते त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.