कबनूर-रुई येथे तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक…

0
88

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर-रुई रस्त्यावर तलवार आणि चाकू घेऊन फिरत असलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहंमदशादाब राजू मुल्ला (वय २१, रा. तिरंगा कॉलनी, कबनूर) आणि अक्षय राजू चव्हाण (रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबनूर-रुई रोडवर हे दोघेजण हातात तलवार आणि चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. तसेच आज फरारी अक्षय चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर करीत आहेत.