Published September 19, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक, कॉन्स्टेबलसह त्यांच्या पंटरला ४० हजारांची लाच स्विकारताना आज (शनिवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरिक्षक अभिजित शिवाजी गुरव, पोलीस कॉन्स्टेबल रोहीत राजेंद्र पोवार आणि त्यांचा पंटर रोहीत रामचंद्र स्वरप (रा. उजळाईवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

राजारामपुरी पोलीस स्टेशनमधील दाखल असलेल्या मटका आणि जुगाराच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना सहआरोपी न करण्यासाठी त्यांच्याकडे ६० हजारांच्या लाचेची मागणी केली. यातील २० हजारांची रक्कम घेतली गेली. त्यानंतर परत ४० हजारांची मागणी तक्रारदारांकडे करण्यात आली. यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली.

यावेळी लाचलुचयपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज ४० हजारांची लाच स्विकारताना त्यांना अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक आदीनाथ बुधवंत, पोलीस निरिक्षक जितेंद्र पाटील, शरद पोरे, विकास माने, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने आदींनी केली.

 

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023