रायगडावर खडा पहाऱ्यासाठी जिल्ह्यातून जाणार अडीच हजार धारकरी…

0
788

टोप (प्रतिनिधी) : रायगडावर खडा पहारा देण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या तुकडीतील धारकऱ्यांचा शपथविधी सोहळा आज (मंगळवार) शिरोली येथे उत्साहात पार पडला. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठानच्या पुलाची शिरोली व करवीर तालुका शाखेतर्फे श्री रायगड सुवर्ण सिंहासन खडा पहारा यादी संकलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या तुकडीमध्ये करवीर तालुक्यातील पंधरा आणि हातकणंगले तालुक्यातील दहा गावांतील सुमारे अडीच हजार धारकऱ्यांचा समावेश आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्याकडून त्यांना खडा पहारा शपथ देण्यात आली. तसेच या धारकऱ्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. देसाई यांनी या उपक्रमाचा उद्देश विशद केला.

या प्रसंगी शिवप्रतिष्ठान जिल्हाप्रमुख ह. भ. प. विठ्ठल पाटील (तात्या), जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, करवीर तालुकाप्रमुख नितीन चव्हाण, शिरोली कार्यवाह युवराज चौगले, संग्राम चौगुले, अनिकेत पाटील, युवराज करपे, या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे अनिल खवरे, शीतल पाटील, वैभव चौगुले, महेश पाटील उपस्थित होते.