शिरोली खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक

0
620

टोप (प्रतिनिधी) : दारुची बाटली आणण्यास नकार दिल्यामुळे अमित राठोड याचा चाकूने भोकसून बुधवारी खून केला होता. याप्रकरणी समीर नदाफ (वय २०) आणि योगेश साखरे (वय २०, दोघेही रा. गांधीनगर) यांना काहीच तासातच अटक करण्यात शिरोली आणि गांधीनगर पोलिसांना यश आले. संशयित आरोपींना आज (गुरूवार) पेठवडगांव कोर्टात हजर केले असता त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील २२ वर्षीय अमित राठोड याचा बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास पंचगंगा नदीजवळील दर्ग्याच्या पाठीमागे असणाऱ्या शेतात मित्रांनी खून केला होता. घटनास्थळी मयताचा मोबाईल फोन पोलिसांना आढळून आला होता. त्यावरून आरोपींची नावे राञीच निष्पन्न झाली. शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर समीर नदाफ आणि योगेश साखरे यांना गांधीनगर येथून  अटक करण्यात आली.