कोरोनामुळे टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे निधन

0
141

मुंबई (प्रतिनिधी) :  गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणारी टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे निधन झाले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत ‘गुलाबो’ ही व्यक्तिरेखा साकारणारी दिव्या यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते, त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दिव्या यांना हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री अडीच वाजता अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यानंतर ३ वाजता डॉक्टरांनी सांगितले की, दिव्या आता या जगात नाही. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ शिवाय दिव्या सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हा कभी ना, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से, तेरा यार हूं मैं सारख्या मालिकांमध्ये दिसल्या होत्या.