कौशल्याचा उपयोग करून ‘स्टार्टअप’ सूर करा : अजय कोंगे

0
15

कुंभोज (प्रतिनिधी) : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून स्टार्टअप सुरू करावे असे प्रतिपादन संजय घोडावत पॉलीटेक्निकचे कौशल्य व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा. अजय बी कोंगे यांनी केले. श्री. अण्णासाहेब डांगे आर्टस्, कॉमर्स, अँड सायन्स कॉलेज हातकणंगले येथे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिना निमित्ताने भारतात स्टार्ट-अपसाठी संधी आणि आव्हाने या नॅशनल सेमिनार मध्ये स्टार्टअप इंडिया अंतर्गत धोरण आणि उपक्रम विषयातील व्याख्यानात ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी छगनराव नांगरे संचालक, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर,  प्राचार्य डॉ. योजना जुगळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अशोकराव जाधव, डॉ. वंदना खरात, विजय डोंगरे, अब्दुल सरकवास  आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. कोंगे म्हणाले, विदयार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची क्षमता विकसित करायला हवी. तसेच असलेल्या गुणांना कौशल्याची जोड देऊन नवसंकल्पनेचा ध्यास घेणे गरजेचे आहे व यातूनच स्टार्टअप सुरु करावे. कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना शासन लाखो रुपये द्यायला तयार आहे परंतु आज मुलांमध्ये कौशल्याचा अभाव जाणून येतो आहे. त्यामुळे ईथून पुढचे संपूर्ण जग हे कौशल्यपूर्ण व मूल्याधिष्ठित उपक्रमावर आधारित असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्ञानाबरोबर कौशल्य विकसित करणे हि काळाची गरज आहे. स्टार्टअप इंडिया केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचे सखोल मार्गदर्शन प्रा.कोंगे यांनी केले.