आळते येथे तुकाराम महाराज बीजसोहळा उत्साहात

0
64

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील क॥ आळते येथील श्री हनुमान मंदिरात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा भक्तिमय वातावरणात आज (मंगळवार) पार पडला. तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. तुकाराम महाराजांच्या अभंगात भजनी मंडळ तल्लीन झाले होते.

शुद्ध बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान लाभले व हे काव्य मराठी संस्कृतीची गुण वैशिष्ट्ये सारभूत होऊन प्रगट झाली. अस्सल मराठी पोताची शब्दकळा भाषेच्या सुक्ष्म पदरांसह तुकोबांच्या काव्यात व अभंगात उमटले आहेत. महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष म्हणून संत तुकाराम महाराजांचे काव्य, अभंग हे मनाला अतिशय भावणारे आहेत. ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा उत्कर्ष होत आहे.