इचलकरंजी येथे ट्रकची मोटरसायकलला धडक : महिला गंभीर

0
126

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील डेक्कन चौकात गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मोटार सायकलस्वाराला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे मोटरसायकलवरील महिला महानंदा मारूती कोकाटे (वय ३४, रा. सरनोबतवाडी) ही गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास घडला.

आज डेक्कन चौकातून महानंदा कोकाटे या आपल्या पती आणि लहान मुलासोबत मोटरसायकल क्र. (एमएच ०९ सीपी ४१३५) या जात होत्या. यावेळी गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकने क्र. (एमएच ४३ बीजी ९८४६) मोटरसायकलला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की महानंदा कोकाटे या मागील चाकात सापडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. 

कोकाटे यांना इचलकरंजीच्या आयजीएम रूग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हीलला हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत करून चालकाला ताब्यात घेतले आहे.