कोल्हापूर बाजारसमितीनजीक ट्रकचालकाची आत्महत्या

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर बाजार समितीनजीकच्या बागेमध्ये एका ट्रकचालकाने झाडाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. कृष्णात महादेव चव्हाण (वय ३२, रा. पोर्ले, ता पन्हाळा) असे मृताचे नाव आहे.

कृष्णात चव्हाण हे कोल्हापुरातील बाजार समिती व मार्केट यार्ड परिसरातील काही ट्रकवर चालक म्हणून नोकरी करत होते. आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास त्यांनी बाजार समितीजवळ असणाऱ्या बागेतील झाडाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून  आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.