कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीने प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे व अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेल्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथे स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुषांच्या माहितीचे भित्ती प्रदर्शन, चित्र व चरित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व्ही. डी. माने यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मारक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त विनायक औंदकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, नारायण भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सुरेश पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष दिपीप पेटकर, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, जनसेवा फाऊंडेशनचे प्रतिनिधी सागर कोगले, अशोक जाधव, उमेश बुधले, एस. आर. पाटील, सुंदरराव देसाई, शारदा पाटील, रुपा शहा, दिलीप पेटकर, जनार्दन पोवार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.