वीर जवान प्रशांत निर्मळे यांना राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडून आदरांजली…

0
22

टाकळीवाडी (प्रतिनिधी) : सैन्यदलातून सुट्टीवर घरी येण्यासाठी निघालेल्या टाकळीवाडीच्या वीर जवान प्रशांत निर्मळे यांचे अपघाती निधन झाले होते. आज (गुरुवार) त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी टाकळीवाडी येथे आणण्यात आले होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली.

ना. यड्रावकर यांनी जवान निर्मळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार आरगे, सैन्य दलातील अधिकारी, जवान उपस्थित होते. यावेळी अमर रहे, अमर रहे, प्रशांत निर्मळे अमर रहे अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा टाकळीवाडी गावामधून काढण्यात आली. यावेळी गावातील सर्वच अबालवृद्ध या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. टाकळीवाडीतील ग्रामस्थांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून जवान निर्मळे यांना आदरांजली वाहिली. सैन्य दलाच्यावतीने जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवाला मानवंदना देऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.