शहीद शेतकऱ्यांना ‘आप’कडून श्रद्धांजली…

0
106

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्ली येथील टिकरी आणि सिंधू सीमेवर शेतकरी गेले तीन आठवडे केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन शेती कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात वीस शेतकरी शहीद झाले. आज (रविवार) कोल्हापूरातील बिंदू चौक येथे मेणबत्त्या लावून शहिदांना आम आदमी पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटनमंत्री सूरज सुर्वे व आदम शेख, महिला शहाराध्यक्षा अमरजा पाटील, अश्विनी गुरव, गिरीश पाटील, विभाग प्रमुख विशाल वठारे, दत्तात्रय सुतार, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते.