प्रवीण पाटील यांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण

0
109

बांबवडे (प्रतिनिधी) : युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील यांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रविण पाटील यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. निसर्ग संवर्धनाकरिता त्यांनी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पोलीस ठाणे आदी ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.