कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांची मंत्रालयातील मृदा आणि जल संधारण विभागाच्या अवर सचिव म्हणून बदली झाली. त्यामुळे देवस्थानच्या सचिव पदाचा तात्पुरता कार्यभार धर्मादाय आयुक्त शिवराज नाईकवडी यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश देवस्थानचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले.

विजय पोवार यांनी १६ ऑगस्ट २०१६ मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कार्यभार स्वीकारला होता. त्यापासून  त्यांनी अनेक विधायक काम केली  आहेत.  जोतिबा  येथे दर्शन मंडप व बहूमजली स्वछतागृह उभारणी, नृसिंहवाडी येथे बहुउद्देशीय हॉल व भक्त निवास उभारणी, ताराबाई रोड कोल्हापूर येथे ७ मजली भक्त निवासाची उभारणी,  प्रथमच केंद्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक मंत्रालय यांच्याकडून साऊंड यंत्रणा व एलईडी यंत्रणा यासाठी निधी मंजुरी, मंदिर सुरक्षेसाठी  यंत्र सामग्री व सुरक्षा रक्षक यांची निवड, तसेच मोरेवाडी व जावळाचा गणपती रंकाळा येथील जमीन ताब्यात घेणे,  आदी धडाडीचे  निर्णय त्यांनी घेतले होते.