कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लजच्या उपविभागीय प्रांत अधिकारी विजया पांगारकर आणि गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे यांची २ ऑक्टोंबरच्या दरम्यान तडकाफडकी बदली झाली होती. या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. मॅटमध्ये त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली असून आज (शुक्रवार) परत एकदा त्यांनी त्याच ठिकाणी कार्यभार हातात घेतला आहे.

गडहिंग्लजच्या उपविभागीय प्रांत अधिकारी विजया पांगारकर आणि गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे यांची २ ऑक्टोबरला तडकाफडकी बदली झाली होती. त्यांच्या जागी नव्याने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि  तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर मंगळवार (दि.६) ऑक्टोबर रोजी नवीन प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी पदभार देखील घेतला होता. पण प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि दिनेश पारगे या दोघांनेही मुदतपूर्व बदली झाली म्हणून मॅटमध्ये दाद मागितली होती. मॅटमध्ये त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली असून आज परत त्यांनी त्याच ठिकाणी पदभार स्वीकारला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदलीचा सपाटाच सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर शहराच्या डीवायएसपी प्रेरणा कट्टे, जिल्हापरिषदचे सामान्य प्रशासनाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि कोल्हापूरचे स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यासह अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाल संपलेला नाही. महापूराच्या आणि कोरोनाच्या काळात या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. असे असताना देखील यांच्या बदल्या झाल्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. खरेतर चांगले काम करत असताना आणि कार्यकाल न संपता केल्या जाणाऱ्या बदल्या कोणाच्या स्वार्थासाठी केल्या जात आहेत ? हाच एक औत्सुक्याचा विषय आहे.