रांगोळी (प्रतिनिधी) : गेली तीन वर्षे कोरोनामुळे अनेक लोकांचे बळी गेले. यामध्ये रांगोळीमधील दोन डॉक्टर आणि दहा ते बारा नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, रांगोळी गावामध्ये अजून ही या नियमांचे पालन करताना नागरीक दिसत नाहीत.

रांगोळी गावामध्ये कोरोना नियमांनाच चक्क फाटा देत गावातून बिनधास्तपणे नागरीक विनामास्क फिरत आहेत. तसेच कोठेही सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नाही. यासाठी रांगोळी ग्रामपंचायतची आरोग्य यंत्रणा कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. तर कोरोना रूग्ण बरा झाला तरीही तो होम क्वांरटाईन न होता गावातून फिरताना दिसत आहेत. यामुळे वेळीच खबरदारी घेतली नाही तर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक रांगोळी गावात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नागरीकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.