व्यापाऱ्यांनी ‘या’ शिबिरात कागदपत्रांसह सहभागी होण्याचे आवाहन

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील ज्या व्यापारी तसेच फर्मनी एलबीटी असेसमेंट करुन घेतलेले नाही, त्यांच्यासाठी करनिर्धारण पूर्ण करुन कागदपत्रे स्वीकारण्यासाठी महापालिकेतर्फे शुक्रवारी (दि.६) विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. शहरातील व्यापारी तसेच फर्मनी कागदपत्रे देवून करनिर्धारण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

त्या म्हणाल्या, ज्या व्यापारी तसेच फर्मनी एलबीटी असेसमेंट करुन घेतलेले नाही. त्यांच्यसाठी करनिर्धारण पूर्ण करुन घेण्याची अंतिम संधी १२ नोव्हेंबर २०२० अखेर रविवार वगळता कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्यासाठी विशेष कॅम्प कोल्हापूर महानगरपालिका छ. शिवाजी मार्केट दुसरा मजला येथे स्थानिक संस्था कर कार्यालयामध्ये आयोजित केला आहे. यासाठी विवरण पत्र  स्थानिक संस्था कर भरणा केलेली चलणे, खरेदी मालाची नोंदवही व स्थानिक नोंदणीकृत माल खरेदी नोंदवही, बिले, नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक, महापालिका हद्दी बाहेर एकापेक्षा जास्त अन्य ठिकाणी व्यवसायाचे ठिकाण असल्यास फक्त महापालिका हद्दीतील शाखेची सी.ए.नी प्रमाणित केलेले स्वतंत्र नफा तोटा, ताळेबंद पत्रक व तेरीज पत्रक, व्हॅट रिर्टन, व्हॅट ऑडिट रिपोर्ट, मासिक खरेदी नोंदवही व माल आवक जावक नोंद वही, खरेदी बिले व विक्री बिले, विवरण पत्रातील क्लेम केलेल्या वजावटी व करसूटी बाबत पूराव्याची कागदपत्रे, महापालिका हद्दीत आलेल्या व बाहेर गेलेल्या मालाची ट्रान्सपोर्ट बिल्स, कुरीअर बिल्स व अन्य कर निर्धारणासाठी आवश्यक कागदपत्रे, व्यवसायाच्या पत्याचा पुरावा अशी कागदपत्रे घेवून यावेत.