बारामतीत राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाची चिठ्ठी लिहून व्यापाऱ्याची आत्महत्या

0
60

बारामती (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावे लिहून एक व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार बारामती येथे घडला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारीच राहणारे व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्याच्या मुलाने बारामती पोलिसांत ९ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असून त्यांच्या जाचाला कंटाळून निराशेमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, शहा यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. आरोपींनी प्रीतम शहा यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते, असा आरोप केला जात आहे.