उसतोड मजूरप्रकरणी ट्रॅक्टरमालकाची फसवणूक : मुकादमावर गुन्हा

0
63

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०१९-२० ऊस गळीत हंगामात साखर कारखान्याला वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरवर ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून करार केला. मात्र, २ लाख ६० हजार रुपये घेऊनही मजूर पुरविले नाहीत. या फसवणूकप्रकरणी एका मुकादमावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकोश राठोड (वय ३८, रा. वरुड लोणी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे त्याचे नाव असून याप्रकरणी ट्रॅक्टरमालक मधुकर पाटील (रा. हळदी ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हळदी येथील ट्रॅक्टरवर मालक मधुकर पाटील यांच्याकडून ऊस वाहतूक करण्याकरिता ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून कराराद्वारे २० हजार रुपये रोख घेतले. तर आर. बी. एल. बँक कोल्हापूर येथून आरोपीच्या पुणे येथील बँक ऑफ इंडिया फर्ग्युसन शाखेच्या खात्यावर २ लाख ४० हजार रुपये ‘एनएफटी’द्वारे पाठवले. मात्र आरोपीने कराराप्रमाणे ऊसतोड मजूर पुरवले नसल्याने २ लाख ६० हजार रुपये फसवणूक प्रकरणी मधुकर पाटील यांनी आकाश राठोड विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.