Published October 27, 2020

राधानगरी (प्रतिनिधी) :  तरुणीस मोटारीतून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार आज (मंगळवार) दुपारी फेजिवडे ते दाजीपूर रस्त्यावर घडला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार राधानगरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रंगराव व्हरकट (रा. पडळी, ता. राधानगरी) आणि अनुज गोठणकर (रा. राधानगरी) अशी या नराधमांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता खासगी नोकरी करीत असून व्हरकट आणि गोठणकर यांनी आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास तिला जबरदस्तीने मोटारीत बसवून पळवून नेले. फेजिवडे ते दाजीपूर रस्त्यावर झुडपामध्ये तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्यासह घरच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तिला राधानगरी येथे आणून सोडले. पीडितेने राधानगरी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023