टोप (प्रतिनिधी) :  मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अविरत पणे झगडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शनिवार) जयंती टोप, शिरोलीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सरपंच रुपाली तावडे यांनी गावचा विकास करण्यास तसेच बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यास कटिबद्ध असून त्यांच्या विचाराप्रमाणे गावात २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणार असल्याचे सांगितले. शिवसेना गावागावात पोहचली असुन बाळासाहेबाचे स्वप्न साकार झाले आहे बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत असल्याचे महेश चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी शिरोली उपसरपंच सुरेश यादव, अनिल खवरे, बाजीराव पाटील, टोप उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, बाळासो चव्हाण, बाजीराव पोवार, डी.एस.पाटील, राजू कोळी, ग्रामसेवक पोपट परिट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.