टोप आरोग्य उपकेंद्र सर्वसोयीनियुक्त करणार : डॉ. प्रदिप पाटील

0
400

टोप (प्रतिनिधी) : टोप आरोग्य उपकेंद्रात काही प्रमाणात सोयसुविधांची गैरसोय आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज इमारत करून उपकेंद्रास नवसंजीवनी देण्यात येईल, असे हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदिप पाटील यांनी आज (रविवार) येथे सांगितले.

टोप येथे पल्स पोलिओ अभियानाला पाटील यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी आरोग्य उपकेंद्राची पाहणी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दरम्यान, टोप आरोग्य उपकेंद्राअंतर्गत टोप, संभापूर, कासारवाडी येथील शिबिरात सुमारे १ हजार ५४ बालकांना लसीकरण करण्यात आले. या वेळी डॉ. प्रिती दातीर, डॉ. एस. आर. कांबळे, आरोग्यसेविका, आशासेविका समता शेटे, सुनिता गायकवाड, गीता पिसाळे, शोभा जाधव, उर्मिला कुरणे, संजय शेटे, पोपट पाटील आदीसह महिला उपस्थित होत्या.