टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून टोप गाव हे हातकणंगले गावातील हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनानकडून गार्भियाने लक्ष देऊन सर्व्हे तसेच इतर उपायोजना केल्या जात आहेत.

यातच महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व्हे सुरु असताना गावात आज (गुरुवार) शाखा अभियंता हातकणंगले ए. एस. शेळखे यांनी टोप गावास अचानक भेट देऊन, माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा सर्व्हे कश्यापद्दतीने सुरु आहे, या सुरु असलेल्या कामाची पहाणी केली. तसेच तपासणी प्रभावीपणे होण्यासाठी कर्मचार्यांना सूचना करुन कोरोना रुग्ण किती आहेत, किती लोक क्वारंटाईन आहेत तसेच लोकांकडून काही सूचना आहेत का, अशी माहिती घेतली. त्याच्यांकडे टोपसह १५ गावचे पालक अधिकारी म्हणून जबाबदारी आहे.

यावेळी गावच्या सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजी पाटील, तलाठी एस. आर. चौगुले, पोलीस पाटील महादेव सुतार, ग्रामसेवक पोपट परीट, मयुर देसाई, समता शेठे, राजकुमार कांबळे, सुनिल कांबळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.