कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील म्युझिक लव्हर्स ग्रुपतर्फे ‘बरसात की धून’ हा पावसावरील हिंदी आणि मराठी गाण्यांचा सुमधुर कराओके साऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यादिवशी डॉक्टर डे आणि कृषी दिन असून याचे औचित्य साधत या ग्रुपने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी कृषी-वृक्षसंगोपन क्षेत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी अलौकीक काम केले आहे, अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सुमधूर कार्यक्रम कोल्हापूरातील दसरा चौक येथील राजर्षि शाहू स्मारक भवन येथे उद्या (शुक्रवार) सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत होणार आहे. तर या कार्यक्रमाचे डिजिटल मिडीया पार्टनर म्हणून ‘लाईव्ह मराठी’ असणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, छ. शाहू महाराज कृषी विद्यालय, कोल्हापूरातील डॉ. अशोककुमार पिसाळ,  आणि (एमएसईएनटी) शिवकुमार सोलापूरकर, हे असणार आहेत. तर या कार्यक्रमात डॉ. जे. पी. पाटील (ज्येष्ठ कृषी संशोधक), डॉ. विनोद वागळे (श्रध्दा हॉस्पिटल), डॉ. सुरेश जेमेनीस (समर्थ क्लिनिक), महारुद्र पाटील (प्रगत शेतकरी), सुहास वायंगणकर (वृक्ष प्रेमी), अमोल बुढ्ढे (वृक्ष प्रेमी), पारितोष उकीरेकर (वृक्ष प्रेमी) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

रसात की धून कार्यक्रमात म्युझिक लव्हर्सचे कलाकार गाणी सादर करणार असून सर्व रसिक श्रोत्यांनी या गाण्याचा आस्वाद घ्यावा. तसेच या कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ कुपन काढण्यात येणार असून यावर छत्री बक्षीस मिळणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने करण्यात आले.