नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हरियाणाच्या कथुरा गावातीलल्या १९ वर्षीय नेमबाज मनीष नरवाल यांने सुवर्णपदकावर निशाणा साधत इतिहास रचला. मनीषने पहिल्या दोन शॉटमध्ये १७.८ स्कोर केला होता. मात्र, त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. ५ शॉट नंतर मनीष नरवाल टॉप थ्रीमध्ये आला. पाच शॉटनंतर त्याचा स्कोर ४५.४ होता तर १२ शॉटनंतर मनीषचा स्कोर १०४.३ होता.

सिंहराजने याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले आहे. सिंहराज अधानाने याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल पी १ प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. आता त्याने रौप्यपदक जिंकले आहे.

दरम्यान, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी दोन पदकाची भर पडली आहे. भारताच्या खात्यात आता एकूण १५ पदके झाली आहेत. याआधी भारताला अवनी लेखराने १० मीटर शूटिंगमध्ये तर सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे. भारताने आतापर्यंत ३ सुवर्णपदक, ७ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदक जिंकली आहेत.