आजचे आघाडी सरकार म्हणजे एकत्रीत आलेले तीन सावत्र भाऊ : सदाभाऊ खोत

0
110

रांगोळी (प्रतिनिधी) : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रांगोळीतील पूरबाधित भागाची आज (बुधवार) पाहणी केली. नदीवेस, मुलाणीवाडी परीसरात जाऊन येथील लोकांच्या समस्या पाहिल्या. यावेळी भागातील अनेक नागरीकांनी आम्हाला राहण्यासाठी जागा आणि कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी, आजचे आघाडी सरकार म्हणजे एकत्र आलेले तीन सावत्र भाऊ असल्याची टिका कुणाचेही नाव न घेता केली.

तसेच सन २०१९ च्या महापुरात जी शासकीय मदत मिळाली तशी मदत मिळत नसल्याचे इथल्या नागरीकांनी सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी याबाबत शासनाकडे तुमच्या समस्या मांडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रांगोळीतील प्रलंबित रिकाम्या प्लॉटचा विषय लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आताचे आघाडी सरकार म्हणजे एकत्र आलेले तीन सावत्र भाऊ अशी टिका कुणाचेही नाव न घेता केली.

यावेळी प्रकाश पाटील, अनिल शिरोळकर, प्रफुल्ल मगदुम, सुदर्शन पाटील, सुनील पाटील, शशीकांत पाटील, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.