औरंगाबाद (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी खुले झाले आहे. पण रोज मर्यादित प्रवेश देण्यात येत असल्याने पहिल्यांदा ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जागतिक वैभव लाभलेले अजिंठा, वेरुळ लेणी पर्यटकांसाठी खुले झाले आहेत.

लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टान्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजीही पर्यटकांना घ्यावी लागणार आहे. लेण्या पाहण्यासाठी मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी दर दिवशी केवळ २ हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यार असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी पर्यटकांना केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करावी लागणार आहे. पर्यटक पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करु शकतील. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल.