टोप (प्रतिनिधी) : छ.शिवाजी महाराज यांची जगदंब नावाची तलवार इंग्लंडमधील संग्रहालयात आहे. ती भारतात परत आणण्यासाठी ‘शिवदुर्ग संवर्धन’च्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे येथे २३ मार्च रोजी होणाऱ्या भारत – इंग्लंड सामन्यावेळी इंग्लड संघासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी दिली. टोप येथे आज (मंगळवार) झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  

२३ मार्चला शिरोली येथे रास्ता रोको, तर कोल्हापुरात निदर्शने करण्यात येणार असून काही गोष्टी गनिमी काव्याने होणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. आपल्याला इंग्रजाकडून शिवरायांची तलवार परत आणायची आहे. आंदोलन, चळवळी, निदर्शने, गनिमी कावे करुन धमाका करायचा आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.

यावेळी सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, अंजना सुतार, रंजना पाटील, माणिक देवाळकर, पांडुरंग पाटील, दौलत पाटील, विठ्ठलपंत पाटील, श्रीरंग तावडे, सुनिल काटकर, दीपक पाटील, प्रताप वरिंगे, रुषी पोवार, अक्षय मुळीक, अभि शिणगारे, डॉ. राजेंद्र पाटील आदीसह शिवप्रेमी उपस्थित होते.