युवासेनेतर्फे कुरुंदवाड येथे आ. नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन…

0
74

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे शिवसेना, ठाकरे कुटूंबीय, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याबाबत अक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी युवासेनेतर्फे आ. नितेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आ. राणे यांच्या विरोधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, प्रतिक धनवडे, निलेश तवंदकर, मंगेश पाटील, वैभव गुजरे, बाबासो सावगावे, आप्पासाहेब भोसले, दिग्वीजय चव्हाण, संतोष नरके, आप्पा गावडे, पिंटू हेरवाडे आदी उस्थितीत होते.