केडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणार : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
139

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सहा वर्षांपूर्वी आर्थिक डबघाईला आलेल्या केडीसी बँकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला. त्यामुळे बँक दिडशे कोटींच्या नफ्यात आहे. राज्यात सर्वाधिक इन्कमटॅक्स भरणारी बँक म्हणून नाव लौकिक आहे. भविष्यात बँकेच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्कर्ष करून सेवा-सोसायट्या आर्थिकदृष्टया सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ते आज (रविवार) कुरुंदवाडमध्ये नागरी सत्कारावेळी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील होते. तर संजय पाटील-यड्रावकर, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, विजय भोसले, राजेंद्र घारे, आप्पासाहेब भोसले, सत्यजित बिडकर आदींची प्रमुख उपस्थितीती होती.

यावेळी ना. संजय पाटील-यड्रावकगर म्हणाले, केडीसी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची आणि मदतीची उतराई करण्याच्या दृष्टीने ठरावधारकांनी ही निवडणूक हाती घेत यश संपादन केले. तर केडीसी बँकेची निवडणुक हा ट्रेलर होता आता कुरुंदवाड पालिका पिक्चर अभी बाकी हे असे सांगत  कुरुंदवाड पालिका निवडणुक लढवणार असल्याचे संकेत दिले.

यावेळी जवाहर पाटील, बाळासो दिवटे, अक्षय आलासे, सुहास पासोबा, सुरेश बिंदगे, किरण आलासे,शरद आलासे, रघु नाईक, फारूक जमादार, संतोष धनवडे, जय कडाळे,महेंद्र पाटील, दीपक पोमाजे, महावीर दिवटे, इकबाल बैरागदार आदी उपस्थित होते.